चार वर्षाच्या अफेयरनंतर केले लग्न, दोन दिवसातच दोघांनीही केली आत्महत्या

चार वर्ष एकमेकांसोबत प्रेमाच्या आणाभाका घेतल्यानंतर त्या दोघांनी परिवाराच्या संमतीने 30 जूनला लग्न केले. लग्नाच्या वेळी ते दोघे खूप खूश होते. आनंदात त्यांनी लग्नाच्या व लग्नानंतरच्या सर्व विधी पार पडल्या मात्र लग्नाच्या तीन दिवसानंतरच काय घडले कुणालाच काही कळले नाही. नवऱ्या मुलाने घरातून निघून जात रेल्वेखाली येऊन आपला जीव दिला. पतीच्या निधनाने दुखी झालेल्या नवरीने देखील दुसऱ्या दिवशी गळफास लावून आत्महत्या केली. चार दिवसांपूर्वी आनंदाचे वातावरण असलेल्या दोघांच्याही घरात अचानक मातम पसरला.

दिल्लीतील गाजियाबाद परिसरात राहणाऱ्या निशा व विशाल यांचे चार वर्षांपासून अफेयर होते. निशा एका मल्टीनॅशनल कंपनीत एचआर होती तर विशाल एका कोचिंग क्लासमध्ये शिक्षक होता. दोघांनी 29 जून रोजी परिवाराच्या संमतीने लग्न केले. लग्नानंतर तिसऱ्या दिवशी विशाल काही कामानिमित्त घरातून बाहेर गेला. तो परत आलाच नाही. घरातल्यांनी खूप शोधाशोध केल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. काही वेळाने पोलिसाना रेल्वे स्थानकात विशालचा मृतदेह सापडला. विशालच्या मृत्युने त्याच्या कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसला. निशा काहीच बोलायच्या मनस्थितीत नव्हती. अंत्यसंस्कारानंतर निशाचे पालक तिला घेऊन त्यांच्या घरी गेले. तिथे दुसऱ्या दिवशी निशाने गळफास घेत आत्महत्या केली.

आपली प्रतिक्रिया द्या