नशीबच खराब! जोडप्याला लागली लॉटरी; पण श्वानाने तिकीटच फाडले

‘वेळेच्या आधी आणि नशिबाच्या पुढे काहीच मिळत नाही,’ याचाच प्रत्यय अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये राहणाऱया एका जोडप्याला आला आहे. वास्तविक, या जोडप्याने लॉटरीचे तिकीट घेतले होते. त्या तिकिटावर त्यांनी लॉटरीदेखील जिंकली, परंतु सकाळपर्यंत त्यांच्या पाळीव श्वानांनी लॉटरीचे तिकीट चावून फाडले. तिकीट खराब झाल्यामुळे त्यांना विजयी बक्षीस मिळाले नाही.

मात्र, बऱयाच संघर्षानंतर आणि काही दिवसांनंतर पंपनीने त्यांना बक्षिसाची काही रक्कम दिली. हा सगळा प्रकार या जोडप्याने सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितला आहे. पोस्टमध्ये त्यांनी  म्हटलेय, ‘अलीकडेच आम्ही लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. व्रॅच केल्यानंतर लॉटरी लागल्याचे कळले.

दुसऱया दिवशी तिकीट दाखवून पैसे आणायचे आम्ही ठरवले आणि गाढ झोपी गेलो. मात्र, सकाळी जे घडले ते पाहून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. अलास्कन आणि जॅक या आमच्या पाळीव श्वानांनी अन्न समजून ते तिकीट दाताने फाडले.’ या घटनेनंतर या जोडप्याने लॉटरीच्या तिकिटांचे तुकडे गोळा करून एकत्र करत लॉटरी पंपनीला दाखवले. आधी पंपनीने तिकीट नाकारले. परंतु, जोडप्याने खूप विनवणी केल्यानंतर पंपनीने तिकीट घेण्याचे मान्य केले.