डिसेंबरच का आहे लव्ह बर्डसचा फेवरेट महिना?

66

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नुकत्याच विवाहबंधनात अडकलेल्या विराट आणि अनुष्काच्या लग्नाची जोरदार चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. लग्नात या दोघांनी घातलले कपडे, इटलीत लग्न करण्यामागचा त्यांचा हेतू ते त्यांचं वैवाहिक आयुष्य याबद्दल सगळेजण भरभरून बोलत आहेत. पण या सगळ्यात जास्त चर्चा होत आहे ती या लव्हबर्ड्सने डिसेंबरमध्येच का लग्न केलं याची. तर चला जाणून घेऊया डिसेंबर या स्पेशल महिन्याबद्दल.

खरंतर, डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा महिना. पण या महिन्याला प्रेमाचा महिना असंही म्हटलं जातं. पाश्चात्य देशात तर याच महिन्यात लग्न करण्यासाठी कपल्स उत्सुक असतात. याच कारण म्हणजे नोव्हेंबरला सुरू झालेल्या थंडीने डिसेंबरमध्ये जोर धरलेला असतो. आजूबाजूचं वातावरण आल्हाददायक असतं. ज्यामुळे सगळेच दिवस फ्रेश वाटत असतात.

जम्मू कश्मीरपासून ते जगभरातील विविध देशांत याच महिन्यापासून बर्फवृष्टीस प्रारंभ झालेला असतो. ख्रिसमस आणि न्यू इयरही या महिन्याला स्पेशल बनवतात. ज्यामुळे वर्षभरात झालेले वाद बरेच मंडळी न्यू इयरच्या संध्याकाळी विसरतात व पुन्हा एकत्र येतात. यात गैरसमजुतीमुळे वेगळं झालेल्या कपल्सची संख्या अधिक असते.

आल्हाददायक वातावरणाचा तरुण तरुणींच्या हार्मोन्सवरही परिणाम होतो. यामुळे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या कपल्सचे प्रेम डिसेंबर महिन्यात अधिकच खुलते. त्यांच्यात अधिक जवळीक निर्माण होऊन ते परस्परांचे घनिष्ट मित्र बनतात. जे वैवाहिक जीवनासाठी आवश्यक तंत्र आहे.

तसंच या दिवसात शरीरात उष्णता निर्माण व्हावी यासाठी चॉकलेट्स खाल्ली जातात. चॉकलेट खाल्ल्यामुळे डिप्रेशन दूर होऊन फ्रेश वाटतं. यामुळे आपला मूडही आनंदी असतो आणि असा आनंदी जोडीदार कुणाला बरं नको असतो? म्हणून जगभरातल्या तमाम लव्हबर्ड्ससाठी डिसेंबर हा महिना अधिक स्पेशल असतो.

आपली प्रतिक्रिया द्या