लळा-जिव्हाळा यातून करीयर

83

प्राण्यांची आवड. त्यांचा लळा यातून एक चांगली करीयरची वाट सापडू शकते.

पाळीव प्राण्यांची आवड असणं आणि घरात त्यांचे पालनपोषण करणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काहीजणांना प्राण्यांची आवड असते. त्यांच्या घरात प्राणी असतातच असे नाही, तर काहीजण आवड म्हणून पाळतात, पण त्यांना संगोपनाची माहिती नसते, अशावेळी प्रशिक्षकाची गरज भासते. ज्यांना प्राण्यांच्या संगोपनाची आवड आहे, अशी मुले किंवा मुली पाळीव प्राण्यांच्या संगोपनाचे तंत्र शिकून यामध्ये करीयर करू शकतात. घरातील प्राण्यांनाही कुटुंबीयांप्रमाणे वागणूक द्यायला हवी. मालक-प्राणी यांच्या प्रेमामुळेच त्यांचे खाणे-पिणे, आरोग्याविषयी काळजी, प्रजननचा काळ, मुक्या प्राण्यांना काय हवे नको ते समजून घेणे आवश्यक असते. पाळीव प्राण्यांचे संगोपन करताना अनेक प्रश्न पडतात. यांकरिता त्यांच्याविषयीची माहिती देणारा ‘पेट केअर’ या विषयावर प्रशिक्षण घेणे आवश्यक ठरते.

संधी
कुत्रा, मांजर, कासव, मासे, पशु-पक्षी या प्रत्येकाच्या संगोपनाची पद्धत वेगवेगळी असते. प्रत्येकाचे आरोग्य, आयुष्य, स्वच्छतेच्या पद्धती व आहारही वेगवेगळा असतो. त्यांच्यापासून इजा झाल्यास उपायासाठीही प्रशिक्षक लागतो. काही रुग्णालयांमध्येही प्रशिक्षकाची आवश्यकता असते.

ऑनलाइन अभ्यासक्रम
www.dogspot.in
www.pawsindia.org

  • प्रशिक्षण संस्था
  • नॅशनल ट्रेनिंग सेंटर, ग्वाल्हेर
  • पोलीस मुख्यालय, शिवाजी नगर, पुणे.
आपली प्रतिक्रिया द्या