न्यायालयाची फी वाढली खटल्यांसाठी जादा फी मोजावी लागणार

15

सामना प्रतिनिधी । नागपूर

सरकारने न्यायालयीन फीमध्ये वाढ केली असून त्याबाबतचे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आला. या विधेयकामुळे राज्याच्या तिजोरीत २० टक्क्यांनी भर पडणार असली तरी न्यायालयांवर होणारा खर्च कितीतरी पटीने अधिक असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

न्यायाधीशांची संख्या वाढवली
राज्यातील न्यायाधीशांची संख्या फार कमी होती. २०१५ मध्ये आम्ही न्यायाधीशांची संख्या २० टक्क्यांनी वाढवली. २०९२ न्यायाधीशांपैकी १९७२ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. देशात सगळ्यात जास्त न्यायाधीश महाराष्ट्रात आहेत. निकाल लवकर लागावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. तसेच तुरुंग आणि न्यायालये डिजिटल माध्यमातून जोडल्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेही सुनावणी केली जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अशी झाली फीवाढ
एक लाखापर्यंतचा दावा – ५०० रुपयांनी वाढ
२ लाखांपर्यंतचा दावा – २५०० रुपयांनी वाढ
५ लाखांपर्यंतचा दावा – ८५०० रुपयांनी वाढ
१० लाखांपर्यंतचा दावा – १८,५०० रुपयांनी वाढ
२५ लाखांपर्यंतचा दावा – ६७,००० रुपयांनी वाढ
एक कोटींपर्यंतचा दावा – ३ लाख ५२ हजार रुपयांनी वाढ
फीवाढीचे कमाल शुल्क – १० लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या