सलमानला ‘लवरात्री’ भोवणार, कोर्टाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश

19

सामना ऑनलाईन । मुजफ्फरपूर

अभिनेता सलमान खान विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरपूर कोर्टाने दिले आहेत. सलमानच्या येऊ घातलेल्या ‘लवरात्री’ चित्रपटात हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोपावरून कोर्टाने हे आदेश दिले आहेत.

‘लवरात्री’ या चित्रपटात नवरात्री या उत्सवाच्या नावाचे विद्रृपिकरण केल्याचा आरोप वकिल सुधिर ओझा यांनी तक्रार केली होती. या प्रकरणी सुनावणी दरम्यान सलमान खान, आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरिना हुसेन यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्य़ाचे कोर्टांने मिथानपूर पोलिसांना आदेश दिले आहेत.

सलमान खानचे होम प्रोडक्शन असलेल्या या चित्रपटाच्या शिर्षकावरून काही संघटनांनी हिन्दू उत्सवाच्या नावाला विकृत करत असल्याचा आरोप काही संधटनांनी आरोप केला आहे. 5 आक्टोबरला रिलीज होणाऱ्या ‘लवरात्री’ या चित्रपटात सलमान त्याच्या भाओजीला म्हणजेच सलमानची बहिण अर्पीताचा पती आयुष शर्मा याला बॉलीवूडमध्ये लॉंच करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या