या देशात माणसांपेक्षा गाईंना मारल्यास जास्त शिक्षा मिळते! न्यायाधीशांची खंत

18

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

श्रीमंत बापाची औलाद असलेल्या एका तरूणाने भरधाव गाडी चालवत एका तरूणाला चिरडून मारलं होतं. या प्रकरणी त्याला फक्त २ वर्षांचा तुरूंगवास आणि १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या दुर्घटनेमध्ये एक पत्रकार देखील जखमी झाला होता, ज्याने उत्सव भसीन नावाच्या या आरोपीला पकडला होता. कायदा आंधळा असल्याने साक्षीपुराव्यांच्या आधारावर न्यायाधीश संजीव कुमार यांनी ही शिक्षा सुनावली, मात्र ते या निकालावर फारसे खूश नव्हते. त्यांची नाराजी त्यांनी केलेल्या एका टीपण्णीमुळे स्पष्ट झाली. ते म्हणाले या देशात गाईला मारलं तर ५ ते १४ वर्ष शिक्षा होते मात्र एखाद्या व्यक्तीला गाडीने चिरडून ठार मारल्यास त्याला फक्त २ वर्षांची शिक्षा होते. आपला देश हा रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंमुळे बदनाम झाला आहे आणि  ही दुर्दैवाची बाब आहे असं म्हणत त्यांनी हा निकाला सुनावला

वेगाची आणि पैशांची मस्ती डोक्यात भिनलेल्या उत्सव भसीन याने त्याच्या बीएमडब्लू कारने एका बाईकला उडवलं होतं. यात अनुज सिंह चौहान याचा मृत्यू झाला होता तर एक पत्रकार जखमी झाला होता. या निकालाविरोधात आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचं अनुजच्या भावाने सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या