बॅकस्टेज आर्टिस्टसाठी अमेरिकेतील नाट्य संस्थांकडून मोठा मदतनिधी

761

मराठी माणसाचे नाट्य वेड हे सर्वश्रुत आहे. मराठी रंगभूमीने जागतिक स्तरावर मोठे योगदान दिले आहे. अमेरिकेतील मराठी माणसे देखील महाराष्ट्रातून येणाऱ्या मराठी नाटकांची आतुरतेने वाट बघत असतात. नाटकांची ही परंपरा जतन करून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र गेल्या दोन महिन्यांमध्ये कोरोनाचा थैमान बघता सारे देश लॉकडाऊन झाले आहेत. असंख्य उद्योग व्यवसाय आणि उद्योग यांसोबतच नाट्यसृष्टीला ही त्याचा जबर फटका बसला आहे. नाटक म्हटले की कलाकार महत्त्वाचे तसेच पडद्यामागील असंख्य हातही ही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आली आहे हे लक्षात घेऊन अशा कर्मचाऱ्यांसाठी असंख्य हात जगभरातून पुढे येत आहेत.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्थित रंगमंच, बृहन महाराष्ट्र मंडळ, तसेच अमेरिकेतील विविध नाट्य संस्था यांनी मिळून बॅकस्टेज आर्टिस्टसाठी एक मोठा निधी उभा केला आहे. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष विद्या जोशी आणि त्यांची कार्यकारिणी समिती, रंगमंचचे संस्थापक माधव पाणी आणि स्मिता कऱ्हाडे यांनी त्याला समर्थन दिले आहे. बघता बघता अनेक नाट्यसंस्था या कार्यात सहभागी झाल्या. तसेच प्रशांत दामले, विजय केंकरे, अमेय वाघ, संकर्षण कऱ्हाडे, जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी देखील सर्वांना आवाहन केले. यानंतर 15 दिवसाच्या आत दहा हजार अमेरिकन डॉलर इतका निधी गोळा झाला आणि हा आणि मदतीचा ओघ सुरूच आहे. हा मदत निधी महाराष्ट्र फाउंडेशनच्या तर्फे बॅकस्टेज आर्टिस्ट पर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र फाऊंडेशनचे वैभव साठे आणि राजेश भालेराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

यासोबत बीएमएम तर्फे covid-19 हेल्पलाईन देखील सुरू करण्यात आली आहे.
BMM COVID-19 HELP LINE
1-833-BMM-NAOL
(1-833-266-6265 )

आपली प्रतिक्रिया द्या