कोविड-19 बहुराष्ट्रीय सहकार्याला हिंदुस्थानचा पाठिंबा, अमेरिकेचा विरोध

659
un

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत 168 देशांसह हिंदुस्थाननेही कोविड 19 मुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर बहुराष्ट्रीय सहकार्याच्या बाजूने मतदान केले असून जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या कामास मान्यता दिली आहे. ‘कोविड -19 महामारीला सर्वंकष व समन्वित प्रतिसाद’ या विषयावरील ठरावास आमसभेच्या 193 देशांपैकी 169 देशांनी मतदानाद्वारे पाठिंबा दिला. अमेरिका व इस्रायल यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले असून हंगेरी व युक्रेन हे तटस्थ राहिले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने चांगले काम केल्याच्या ठरावातील उल्लेखास अमेरिकेने आक्षेप घेतला आहे. हिंदुस्थानचे दूतावास उपप्रतिनिधी के. नागराज नायडू यांनी सांगितले की, आम्ही या सर्वंकष ठरावाला पाठिंबा दिला असून सर्व पातळ्यांवर सहकार्याला अनुकूलता दर्शवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या