मी पाय ठेवताच हिंदुस्थानातून कोरोना होईल गायब: फरार नित्यानंद स्वामीचा अजब दावा

कोरोना महामारीमुळे हिंदुस्थानातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. कोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी नित्यानंद स्वामीने अजब दावा केला आहे. हिंदुस्थानात आपण पाय ठेवताच कोरोनाचा खात्मा होईल, असे नित्यानंद स्वामीने म्हटले आहे. त्याने पैलासा देश स्थापन केला आहे. या देशात अजूनही त्याचे प्रवचन सुरू असते. नित्यानंदचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हिंदुस्थानातून कोरोना महासाथीचा आजार कधी संपुष्टात येईल, असा प्रश्न प्रवचनादरम्यान नित्यानंदला त्याच्या शिष्याने विचारला. त्यावर उत्तर देताना नित्यानंदने हास्यास्पद दावा केला.

आपली प्रतिक्रिया द्या