कोरोना सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिला रुग्णाचे लैंगिक शोषण

3981

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात वाढत असून सोमवारी हा आकडा 18 लाख इतका झाला आहे. देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये कोविड रुग्णांवर उपचारांसाठी उपचार केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. अशाच एका कोविड सेंटरमध्ये महिलेचे लैंगिक शोषण झाल्याचे वृत्त आहे.

न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार, हे प्रकरण बेंगळुरू येथी व्हिक्टोरिया रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये घडलं आहे. या रुग्णालयातील एका डॉक्टरवर कोरोनाच्या उपचारांसाठी आलेल्या महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार 25 जुलै रोजी या डॉक्टराने तिचं लैंगिक शोषण केलं.

तिने या डॉक्टराविरुद्ध प्रथम रुग्णालयातील नोडल अधिकाऱ्याकडे तक्रार केली. नोडल अधिकाऱ्याने रुग्णालय प्रशासनाला या प्रकरणी सूचना दिली. त्यानंतर या आरोपी डॉक्टरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. रुग्णालयानेही अंतर्गत चौकशी सुरू केली असून लवकरच या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पोलिसांकडे देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या