राज्यात 24 तासांत 13,885 कोरोनामुक्त; नव्या 11 हजार 447 रुग्णांची नोंद

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज राज्यात दिवभरात एकूण 13 हजार 885 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. तर एकूण 11 हजार 447 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे देखील यावेळी जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, आज एकूण 306 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत एकूण 79 लाख 89 हजार 693 कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 15 लाख 76 हजार 62 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. सध्या राज्यात एकूण 1लाख 89 हजार 715 ऑक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण 13 लाख 44 हजार 368 जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.3 टक्के इतके नोंदविण्यात आले आहे. तर मृत्य दर 2.63 टक्क्यांच्या घरात असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात सध्या 23 लाख 33 हजार 522 व्यक्ती होम क्वारंटाईन असून 23 हजार 408 जण संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आल्याचे आरोग्य विभागातर्फे नमूद करण्यात आले आहे.

मुंबईत दिवसभरात 1,823 कोरोना रुग्ण; 1,644 कोरोनामुक्त, 37 जणांचा मृत्यू
मुंबईत आज दिवसभरात 1,823 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत एकूण 1,644 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 2 लाख 5 हजार 111 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 37 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 37 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 9 हजार 635 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 82 दिवसांवर पोहोचला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या