कोरोना रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी चाचणी बंधनकारक नाही! केंद्राचा मोठा निर्णय

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर वाढत असताना शनिवारी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार आता कोरोना रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक असणार नाही.

रुग्णाला कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर त्याची चाचणी केली जात होती आणि या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले जात होते. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याच्या नियमांमध्ये बदल केलेआहेत. याबाबत नवीन नियमावली जारी करण्यात आली असून त्यानुसार कोरोना रुग्णालयात किंवा कोविड सेंडरमध्ये दाखल होण्यासाठी रुग्णाला आता कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असणे बंधनकारक नसणार आहे.

‘डीआरडीओ’च्या कोरोना प्रतिबंधक ‘2-DG’ औषधाला DCGI ची मंजुरी; ऑक्सिजनची गरज कमी होणार

आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की, ‘कोरोनाच्या संशयित रुग्णांना सीसीसी, डीसीएचसी किंवा डीएचसी वॉर्डमध्ये ठेवता येऊ शकते. तसेच कोणत्याही रुग्णावर उपचार करण्यास किंवा त्याला औषधे, ऑक्सिजन यासारख्या अत्यावश्यक सेवा पुरवण्यास नकार देता येणार नाही. रुग्ण दुसऱ्या शहरातील असला तरीही त्याला सेवा द्यावीच लागेल. एखाद्या रुग्णाकडे आधार कार्ड किंवा ओळखपत्र नसेल तर रुग्णालय त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्यास नाकारू शकत नाही.’

रेकॉर्ड मृत्यू

दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये देशात विक्रमी 4 लाख 1 हजार 78 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच पहिल्यांदाच 4 हजार 187 एवढ्या विक्रमी मृत्यूंची नोंद झाली आहे. यामुळे देशातील मृतांची संख्या 2 लाख 38 हजार 270 वर पोहोचली आहे. सध्या देशात 37 लाख 23 हजार 446 सक्रिय रुग्ण उपचार घेत असून रिकव्हरी रेट देखील घटून 81.90 टक्के झाला आहे.

Tips – रिकाम्या पोटी ‘ही’ 5 कामं अजिबात करू नका, रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा

आपली प्रतिक्रिया द्या