कोरोनावर उपचार करणाऱ्या महिला डॉक्टरवर बलात्काराचा प्रयत्न

5795

कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या कोविड योद्ध्यांप्रति संपूर्ण देशात आदराची भावना आहे. मात्र, या दरम्यान एक संतापजनक प्रकार उघड झाला आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या एका महिला डॉक्टरवर बलात्काराचा प्रयत्न झाला आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, झारखंड येथील रिम्स रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. या रुग्णालयातील अॅनेस्थेशिया विभागाची एक ज्युनिअर डॉक्टर 27 मे रोजी रात्री कोविड वॉर्डवर कर्तव्यावर होती. त्याच वेळी क्रिटिकल केअर विभागाचा एक वरिष्ठ डॉक्टरही तिथे कर्तव्यावर होता. त्याने या डॉक्टरवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

पीडितेने पोलिसात या प्रकरणाची तक्रार केली असून तेव्हापासून हा डॉक्टर फरार आहे. पोलिसांनी तपासकार्य सुरू केलं असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणाची दखल रिम्स रुग्णालय प्रशासनानेही घेतली असून अधिष्ठाता डी. के. सिंह यांनी या प्रकरणावर कठोर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या