देशभरात लसीकरणाला शनिवारपासून सुरुवात, ‘या’ कागदपत्रांची भासणार आवश्यकता

शनिवार (16 जानेवारी) पासून देशभरात कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणासंदर्भात नागरिकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी केंद्रसरकारने विशेष माहिती जारी केली आहे.

लसीकरणासाठी देशातील कानाकोपऱ्यात लस पोहोचवण्यात आली आहे. केंद्राने महाराष्ट्रासाठी एकूण 9 लाख 73 हजार लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत. लसीकरणासाठी एकूण 350 केंद्र असून प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 अशा पद्धतीने पहिल्या दिवशी 35 हजार जणांना लस देण्याचा प्रयत्न आहे.

लसीकरणाच्या नोंदणीसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

लसीकरणासाठी आधारकार्ड, वाहन परवाना, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, बँकेचं किंवा पोस्टाचे पासबुक, पारपत्र, निवृत्ती वेतनासंदर्भातली कागदपत्रे, आरोग्य विमा-स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड यापैकी एक कागदपत्र आपल्या छायाचित्रासह नोंदणीच्या वेळी सादर करावे लागेल. आमदारांनी दिलेलं ओळखपत्र तसेच केंद्र, राज्यसरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांनी दिलेले ओळखपत्रंही ग्राह्य धरले जाईल.

कोरोनामुक्त झालेला व्यक्तीही इतरांना संक्रमित करू शकतो, शास्त्रज्ञांच्या दाव्याने खळबळ

तसेच नोंदणीशिवाय कोणालाही कोरोना लसीचा डोस देण्यात येणार नाही. कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी नोंदणी अनिवार्य आहे. नोंदणी केल्यावरच लस घेण्याचं ठिकाण आणि वेळ याची माहिती लाभार्थ्यांना मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या