कोरोना हे 100 वर्षातील सर्वात गंभीर आर्थिक आणि आरोग्याचे संकट – शक्तीकांत दास

804

कोरोना हे गेल्या 100 वर्षांतील सर्वात गंभीर आरोग्यविषयक आणि आर्थिक संकट असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली. ‘एसीबीय बँकिंग अँड इकॉनॉमिक्स कॉनक्लेव्ह’ या व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही कॉनक्लेव्ह व्हर्च्युअल कॉन्फरन्स स्वरुपात आयोजित करण्यात आली होती. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा बिजनेस आणि अर्थव्यवस्थेवरील प्रभाव ही कॉनक्लेव्हची थीम ठेवण्यात आली आहे. अर्थव्यवस्था बळकट करण्याला रिझर्व्ह बँकेचे प्राधान्य आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक पावले उचलण्यात येत असल्याचे दास यांनी सांगितले. आपली अर्थव्यवस्था आणि आर्थिक प्रणाली किती मजबूत आहे कोरोनाच्या काळात दाखवून दिले आहे. आपल्या आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवरील शतकातील हे सर्वात गंभीर संकट आहे. सर्वच क्षेत्रांवर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे, असे दास म्हणाले. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

कोरोनाचा फेलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या काळात देशांतर्गत उत्पादन, नोकरी, रोजगार, उद्योगधंदे आणि जनतेचे आरोग्य यावर विपरीत परिणाम झाला आहे. हे फक्त देशावरील संकट नसून जागतिक संकट आहे. जागतिक अर्थव्यवस्था, जागतिक चलन मूल्य साखळी, नाणेनिधी यासारख्या सर्वच क्षेत्रावर याचा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत देशाच्या आर्थिक स्थिरतेला महत्त्व आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने पावले उचलल्याचे दास यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या