गर्भवती गायीच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट, आरोपीला अटक

1032

केरळमधील गरोदर हत्तिणीला अननसातून फटाके खाऊ घातल्याने तिचा मृत्यू ओढवला होता. त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये असाच भयंकर प्रकार एका गर्भवती गायीसोबत घडला होता. या दोन्ही घटनांनी प्रचंड जनक्षोभ उसळला होता. आता हिमाचल प्रदेशमधील गायीच्या प्रकरणातील आरोपीला अटक झाल्याचं वृत्त आहे.

या घटनेतील गायीच्या जबड्याला गंभीर इजा झाली आहे. या जखमी गायीचा एक हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या गायीचा मालक गुर्दील सिंग याने त्याचा शेजारी नंदलाल याच्यावर गायीला जाणूनबुजून इजा पोहोचवल्याचा आरोप केला होता. तसेच या घटनेपासून नंदलाल हा फरार असल्याचे गुर्दील याने सांगितले होते. त्या फरार आरोपी नंदलाल याचा शोध लागला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दुसरीकडे, या जखमी गायीवर उपचार सुरू आहेत. तिने एका वासराला जन्म दिला आहे. तिच्या जबड्याला जबर दुखापत झाली असून तिथली हाडं मोडली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या