गाईचे तूप खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीत आहे का?

तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत. तुपाचा मेंदूच्या आरोग्यावरदेखील चांगला फायदा होतो. ज्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्यास मेंदूच्या नसांना योग्य पोषण मिळते.

शारीरिक प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पार पडाव्यात, यासाठी शरीर लवचिक असणं आवश्यक आहे. यासाठी व्यायामाप्रमाणेच पौष्टिक आहारातील घटक देखील तितकीच महत्त्वाची भूमिका निभावतात. शरीर लवचिक राहण्यासाठी शुद्ध तूप कशा पद्धतीने लाभदायक ठरते.

तुपाचे सेवन करणं आरोग्यासाठी अतिशय लाभदायक ठरू शकते. तुपाच्या सेवनामुळे अन्य शारीरिक फायदे सुद्धा भरपूर प्रमाणात मिळतात. नियमित योग्य प्रमाणात तूप खाल्ल्यास आपल्या मेंदूचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते, असे म्हणतात. आरोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसार, शुद्ध तूप हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.

तुपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात. देशी तूप खाल्यानं सांधेदुखी त्रास कमी होण्यास मदत होते.

तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते. हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप लुब्रिकेंटचे काम करते.

शरीर लवचिक राहण्यासाठी आपल्या स्नायूंना आवश्यक प्रमाणात नैसर्गिक स्वरुपात पोषण तत्त्वांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. सोबतच आपले हाडे देखील मजबूत असणं गरजेचं आहे. शरीराच्या या दोन्ही गरजा पूर्ण करण्यामध्ये तूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. म्हणूनच गायीच्या दुधापासूनच तयार केलेल्या तुपाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.

तुपामध्ये तेलापेक्षा अधिक पोषक तत्व असतात. बटर पेक्षा तुपाचं सेवन करणं अधिक चांगलं असतं. तुप घरी तयार करणं अधिक उत्तम आहे. शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट राहते. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना संकेत यांनी ही माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या