रांजणगावात ४ टन गोमांस जप्त, ९ जणांना अटक

23

सामना प्रतिनिधी । पुणे

टेम्पोत भुसा भरल्याचे भासवून त्यातून मुंबईला नेण्यात येणारे चार टन गोमांस गोरक्षकांनी पकडून रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौसर नसीर शेख, अब्दुल नसीम खान, महंमद शाहिद शब्बीर कुरेशी, आरिफ अहंमदलाल दिलबहार कुरेशी, महंमद आरिफ दिलबहार खान, सलीम कलीम खान या नऊ जणांना अटक केली असून तर गायी विकणारा वसीम कुरेशी, मुंबईतील व्यापारी बललू शेठ, गनी भाई यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यापैकी तीन जणांवर चार दिवसांपूर्वीच येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दोन गाड्यांमधूंन ४५ गायी व बैलांचे अवयव सापडल्याने गो तस्करांचे मोठे रॅकेट समोर आले आहे. मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी यासंदर्भात रांजणगाव पोलीसा ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कथित गोरक्षकांविरोधात कठोर कारवाई करा, पंतप्रधानांचा आदेश

नगर रस्त्यावरून मुंबईकडे दोन टेम्पोमध्ये मोठ्याप्रमाणात गोमांस तस्करी केली जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. त्यानुसार गोरक्षकांनी सापळा रचून टेम्पो अडवला. पोलिसांच्या मदतीने या गाड्यांची तपासणी केली असता, एमएच २१ एक्स ७६८७ या मोठ्या टेम्पोमध्ये ३० ते ३५ गायी व बैलांचे मांस भरलेले होते. त्यांच्या बाजूने भुसा भरलेली पोती ठेवली हाती. तर टाटा पिकअप एमएच ०४ एचडी ५६६८ या टेम्पोत सुमारे १० गायी व बैलांचे मांस आढळले.

गोतस्करांकडून गोमांस वाहतूकीसाठी नवनव्या शक्कल लढवल्या जात आहेत. रांजणगाव येथे पकडलेल्या एका टेम्पोत बाहेरच्या बाजूने भुसा भरलेली पोते लावले होती. यापूर्वी भाजी क्रेट, दुधाचा टेम्पो यांचाही वापर केला होता. तसेच शिवाजी महाराज, तुळजा भवानी, जय श्रीराम असे गाडीवर चित्र काढलेले असतात. त्यामुळे गोमांस वाहतूक करताना त्यांच्यावर संशय घेतला जात नाही.

आपली प्रतिक्रिया द्या