‘मरे’चे रडगाणे सुरूच, कल्याण-कसारा वाहतूक विस्कळीत

19

सामना ऑनलाईन । कल्याण

मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे सत्र रविवारपासून सुरू आहे. बुधवारी देखील हे प्रकार सुरूच होते. कल्याण-कसारा मार्गावर आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

याआधी आज सकाळी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील मानखुर्द स्थानकाजवळ रुळांखालील खडी-माती वाहून गेल्याने हा मार्ग अर्ध्या तासासाठी बंद होता. तर मंगळवारी कल्याण-कसारा मार्गावर कामायनी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेवरील अशा तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या