गाडी बंद पडल्याने मध्य रेल्वे कोलमडली

27
सामना ऑनलाइन । अंबरनाथ
अंबरनाथ-बदलापूर दरम्यान क्रॉसिंग लाइनवर तांत्रिक बिघाडामुळे एक गाडी बंद पडली आणि मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास विस्कळीत झाली होती. प्रशासनाने बंद पडलेली गाडी दुसऱ्या इंजिनच्या मदतीने साइडिंगला घेतल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली.
वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. उन्हात गाडी तात्कळत राहावे लागल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. दर रविवारी मेगा ब्लॉक अथवा जम्बो ब्लॉक घेतला तरी मध्य रेल्वेच्या मार्गावर आठवड्यात किमान १-२ वेळा हमाखास बिघाड होऊ लागले आहेत. गाड्या रखडणे, विलंबाने धावणे हे प्रकार रोजच होत आहेत, अशा शब्दात अनेक प्रवाशांनी आपली नाराजी व्यक्त केली.
आपली प्रतिक्रिया द्या