कर्तारपूर कॉरिडॉरचे श्रेय सिद्धू आणि इम्रान खान यांचे,जिरकपूरमध्ये झळकली पोस्टर्स

682

श्री गुरू नानकदेव यांच्या 550 व्या प्रकाशपर्वानिमित्त काँग्रेसने जिरकपूरमध्ये जागोजागी इम्रान खान आणि नवज्योतसिंग सिद्धू यांची पोस्टर्स लावली आहेत. कर्तारपूर कॉरिडॉर सुरू करण्याचे श्रेय नवज्योतसिंग सिद्धू आणि इम्रान खान यांचे असल्याचे या पोस्टरमध्ये म्हटले आहे.

पोस्टरवर इम्रान खान यांच्या बाजूला सिद्धू यांचा फोटो असून पोस्टरवर पंजाबी भाषेत लिहिले आहे की, कर्तारपूरची योजना अमलात आणणारे खरे हीरो नवज्योतसिंग सिद्धू आणि इम्रान खान आहेत. काँग्रेस नेते असलेले नवज्योतसिंग सिद्धू यांचे समर्थक गुरू सेवक सिंह कारकर यांनी ही पोस्टर्स लावली आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानच्या शपथग्रहण सोहळय़ावेळी सिद्धू यांनी शीख भाविकांसाठी कर्तारपूर कॉरिडॉर सुरू करण्याचा सल्ला इम्रान यांना दिला होता.

आपली प्रतिक्रिया द्या