खेळाडूंसाठी ‘क्रीम’ महोत्सव

फुटबॉल, व्हॉलीबॉल, कॅरम, स्क्वॉश, लॉन टेनिस, थ्रो बॉल, रिंक फुटबॉल अशा एकापेक्षा एक खेळांची चुरस रसिकांना पाहायला मिळणार आहे. निमित्त आहे ते विद्याविहार येथील के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या ६ ते १० जानेवारीदरम्यान होणाऱया ‘क्रीम’ महोत्सवाचे. झोरोका प्रस्तुत या महोत्सवाचे ‘दैनिक सामना’ माध्यम प्रायोजक आहे.

के.जे.सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचा ‘क्रीम’ महोत्सव म्हणजे खेळांडूंसाठी पर्वणी. यंदा या महोत्सवाचे पाचवे वर्ष असून तब्बल १४ क्रीडा प्रकार पाहायला मिळणार आहेत. यंदा या महोत्सवाचे उद्घाटन समारंभात हिंदुस्थानी अंध फुटबॉल संघाची उपस्थिती असणार आहे. याबरोबरच मुंबई सिटी एफसीमधील खेळाडू एक देखावा सादर करणार आहेत. दरवर्षी देशभरातील शंभर महाविद्यालयांमधून विद्यार्थी सहभागी होतात. नवोदित खेळाडूंना त्यांच्यातील खेळाडू वृत्तीला या महोत्सवातून प्रोत्साहन दिले जाते.