कोहलीने ‘आयसीसी’ स्पर्धा जिंकायला हव्यात – गांगुली

सध्याचा हिंदुस्थानी संघ आमच्या वेळच्या संघापेक्षा किती तरी अधिक सरस आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने प्रत्येक मालिका जिंकायला पाहिजे असे मी म्हणणार नाही. मात्र त्याने आता ‘आयसीसी’च्या स्पर्धा जिंकण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, असे मत ‘बीसीसीआय’चा होणारा नवनिर्वाचित अध्यक्ष सौरभ गांगुली याने व्यक्त केले. गांगुली म्हणाला, सध्याच्या ‘टीम इंडिया’मध्ये प्रतिभा ठासून भरलेली आहे, मात्र खेळाडू मानसिकदृष्टय़ाही कणखर असायला हवे.

आपली प्रतिक्रिया द्या