वझे क्रीडा प्रतिष्ठानचे निःशुल्क क्रिकेट पंच प्रशिक्षण, 2 एप्रिल ते 2 जुलै 2017 या कालावधीत दर रविवारी भरणार वर्ग; माजी कसोटी पंच पिलू रिपोर्टर, एम. आर. सिंग करणार मार्गदर्शन

सामना ऑनलाईन । मुंबई

डॉ. प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठानने येत्या २ एप्रिल ते  जुलै २०१७ या कालावधीत मुलुंड (पूर्व) येथे निः शुल्क क्रिकेट पंच प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहेत. या वर्गात इच्छुक महिलांनाही प्रवेश दिला जाणार आहे. दर रविवारी दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रशिक्षण दिले जाईल.

१९८७ चे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पंच परीक्षेत सुवर्णपदक मिळविणारे डॉ. प्रकाश वझे हे या पंच प्रशिक्षण शिबिराचे मुख्य संयोजक आहेत. माजी कसोटी पंच पिलू रिपोर्टर व आंतरराष्ट्रीय पंच पॅनेलचे पंच एस. आर. सिंग हे या पंच प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करणार आहेत. हे वर्ग नियोजित कालावधीत ए-१, स्वप्नील, जी. व्ही. स्कीम रोड नं. २, रुची हॉटेलजवळ किंवा म्युनिसिपल शाळेच्या शेजारी, मुलुंड (पूर्व), ४०००८१ येथे घेण्यात येणार आहेत. या वर्गाचा सांख्यिकी (स्कोअरर) परीक्षेलाही उपयोग होऊ शकणार आहे. इच्छुकांनी नोंदणीसाठी डॉ. प्रकाश वझे (९९२०१४८८०६/९८२१०३१००६) किंवा ०२२ २१६३५०४४ येथे संपर्क साधावा.

आपली प्रतिक्रिया द्या