डय़ुप्लेसिसने दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपद सोडले

217

गेल्या काही महिन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सपाटून मार खावा लागला आहे. निराशाजनक कामगिरीनंतर फाफ डय़ुप्लेसिस याने दक्षिण आफ्रिकन संघाच्या कर्णधारपदाचा त्याग केला आहे. आता तो क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात कर्णधार म्हणून भूमिका बजावणार नाही.

फाफ डयुप्लेसिस याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याची टी-20 संघात निवड करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या