आयसीसीच्या चेअरमनपदासाठी बारक्ले-ख्वाजामध्ये रस्सीखेच

आयसीसीच्या चेअरनपदासाठी न्यूझीलंडचे ग्रेग बारक्ले व सिंगापूरचे इम्रान ख्वाजा यांच्यामध्ये रस्सीखेच लागली आहे. आयसीसीच्या महत्त्वाच्या पदासाठी या दोन व्यक्तींनी अर्ज केलेला आहे. येत्या डिसेंबर महिन्यात या पदासाठी निवडणूक होणार आहे.

ग्रेग बारक्ले यांना चेअरमनपदावर विराजमान होण्यासाठी 16 पैकी 11 मते हवी आहेत. हिंदुस्थान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्यासह दक्षिण आफ्रिकन बोर्डाकडूनही त्यांना सपोर्ट हवा आहे. सध्या इम्रान ख्वाजा प्रभारी चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. त्यांना या पदावर कायम राहण्यासाठी सहा मते आवश्यक आहेत. शशांक मनोहर यांनी माघार घेतल्यानंतर इम्रान ख्वाजा गेली चार महिने आयसीसीचे प्रभारी चेअरमन म्हणून कार्यरत आहेत.

आयसीसीच्या भूमिकेमुळे निर्माण झालेले प्रश्न

  • निवडणूक दोनतृतीयांश मताधिक्यानुसार होणार की साध्या मताधिक्यानुसार होणार
  • अर्ज भरण्यासाठी फक्त एक आठवडय़ाची मुदत आणि निकालासाठी सहा आठवडय़ांचा कालावधी
  • चेअरमनपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतरही आयसीसीकडून जाहीर करण्यात का नाही आले?
आपली प्रतिक्रिया द्या