सुपर… सिराजचा बळींचा ‘पंच’, इरापल्ली प्रसन्ना, बिशनशिंग बेदी, झहीर खान यांच्या पंक्तीत मिळवले स्थान

ब्रिस्बेनमध्ये एका डावात 5 बळी घेणारे टीम इंडियाचे फक्त पाच गोलंदाज आहेत. इरापल्ली प्रसन्ना याने एका डावात सर्वाधिक 6 बळी घेतले आहेत. तर बिशनशिंग बेदी, मदन लाल, झहीर खान आणि आता मोहम्मद सिराज यांनी एका डावात पाच बळी घेतले आहेत.

टीम इंडिया आणि ऑस्‍ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात ब्रिस्‍बेनमध्ये सुरू असलेल्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्‍ट मॅचमध्ये चौथ्या दिवशी मोहम्‍मद सिराजने जोरदार गोलंदाजी केली आहे. सिराजने पहिले मार्नस लाबुशेनला 25 धावांवर तंबूत पाठवले, मग मैथ्‍यू वेड (Matthew Wade)याला शून्य धावांवर माघारी धाडले. दोन्ही फलंदाज टीम इंडियासाठी त्रासदायक ठरतात मात्र सिराजने त्यांना परत पाठवून टीम इंडियाची पकड घट्ट केली. सिराजने वेडला बाद केल्याने वेडची ही सगळ्यात खराब खेळी ठरली आहे. त्याला अर्धशतकी खेळी देखील या मालिकेत करता आलेली नाही.

दरम्यान, टीम इंडियासाठी ब्रिस्बेन टेस्ट मध्ये 328 धावांचे लक्ष्य देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या