ट्रेण्ट बोल्ट आला रे…न्यूझीलंड संघाची घोषणा; हिंदुस्थानविरुद्धची कसोटी मालिका

254

डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेण्ट बोल्ट याचे न्यूझीलंडच्या क्रिकेट संघात पुनरागमन झाले आहे. हिंदुस्थानविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली. ट्रेण्ट बोल्टची या संघात निवड झाली असून केन विल्यमसन कर्णधार म्हणून कायम असणार आहे.

न्यूझीलंडच्या या संघात मॅट हेन्री, मिचेल सॅण्टनर आणि जीत रवाल यांना संधी देण्यात आली नाही. एजाज पटेल या फिरकी गोलंदाजाला न्यूझीलंडच्या संघात चान्स देण्यात आला आहे. याचसोबत उंचपुरा वेगवान गोलंदाज काईल जॅमिसन यालाही संधी देण्यात आली आहे.

न्यूझीलंडचा चमू – केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेण्ट बोल्ट, कोलीन डी ग्रॅण्डहोम, काईल जॅमिसन, टॉम लॅथम, डॅरेल मिचेल, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, टीम साऊथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बी. जे. वॉटलिंग.

आपली प्रतिक्रिया द्या