बचावात्मक नव्हे तर आक्रमक फलंदाजी करा; कर्णधार विराट कोहलीचा सहकाऱयांना सल्ला

289

पहिल्या कसोटीत न्यूझीलंडकडून हार सहन करावी लागल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली कमालीचा नाराज झाला आहे. याप्रसंगी त्याने फलंदाजांना कानपिचक्या देताना म्हटले की, बचावात्मक खेळून काही उपयोग नाही. आक्रमक फलंदाजीवर जोर द्या.

बचावात्मक फलंदाजी केल्यानंतर स्वतःच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. धावा मिळत नाही. आता काय करायचे, असा सवाल उपस्थित होतो. अशा वेळी आपण वाट बघत बसतो. मात्र एक अप्रतिम चेंडूने आपण विकेट गमावतो, अशी खंतही पुढे विराट कोहलीने व्यक्त केली. चेतेश्वर पुजाराने 81 चेंडूंत फक्त 11 धावा केल्या होत्या. विराट कोहलीने यावेळी त्याला इशारा दिलाय असे म्हणता येईल.

वेगवान गोलंदाजांना पोषक अशा खेळपट्टीवर प्रतिस्पर्ध्यांना दबावाखाली आणण्यासाठी आक्रमक फलंदाजी करणे योग्य ठरेल. आक्रमक फलंदाजी करताना अपयश आल्यास आपण योग्य विचार करीत होतो, पण यश मिळवता आले नाही असे आपण म्हणू शकतो. याचवेळी प्रयत्न केल्याचे समाधानही मिळेल. – विराट कोहली

आपली प्रतिक्रिया द्या