कोलकात्यातून होणार टीम इंडियाची ‘गुलाबी सुरुवात’

1199

हिंदुस्थानचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुरा आपल्या हाती घेतली असून, लवकरच हिंदुस्थानच्या क्रिकेटमध्ये बरेच मोठे बदल होताना दिसू शकतात. काही दिवसातच आपल्याला टीम इंडियाच्या क्रिकेटमध्ये असे काही बदल पाहायला मिळणार आहे. जे यापूर्वी हिंदुस्थानच्या क्रिकेटच्या इतिहासात पाहायला मिळाले नव्हते. बांगलादेश संघ हिंदुस्थानच्या दौर्‍यावर येणार आहे. यावेळी अशी अपेक्षा केली जात आहे की, या दरम्यान हिंदुस्थान संघ प्रथमच डे-नाईट कसोटी सामने खेळू शकतो.

बीसीसीआयने बांगलादेशला पाठविला प्रस्ताव 

मिळालेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हिंदुस्थान आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या दोन कसोटी सामन्यातील दुसरा सामना हा डे-नाईट खेळाला जावा असा प्रस्ताव पाठवला आहे. कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर हिंदुस्थानचा पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळला जाऊ शकतो. बांगलादेशला हा प्रस्ताव मिळाला आहे. मात्र अद्याप त्यांनी यावर कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.

ehp9xyyxyaauijo

‘गुलाबी बॉल’ने खेळाला जाऊ शकतो डे-नाईट कसोटी सामना

बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरभ गांगुलीही डे-नाईट टेस्ट मॅचच्या बाजूने दिसत आहेत. गांगुलीने काही दिवसांपूर्वी डे-नाईट टेस्टबद्दल सांगितले होते की आम्ही लवकरच यावर विचार करू. हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहलीही याशी सहमत आहे. बीसीसीआयच्या वतीने सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे लवकरच हिंदुस्थानमध्ये ‘गुलाबी बॉल’ने कसोटी सामना खेळला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या