हिंदुस्थानच्या युवा संघाची विजयाची हॅटट्रिक

766

सुशांत मिश्रा व अथर्व अंकोलेकर यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानच्या युवा संघाने येथे झालेल्या अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत अफगाणिस्तानच्या युवा संघावर तीन गडी व 68 चेंडू राखून दणदणीत विजय संपादन केला आणि आशिया कप 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील ‘अ’ गटात सलग तिसऱ्या विजयासह पहिले स्थान पटकावले. अफगाणिस्तानच्या युवा संघाला दोन विजयांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. दोन्ही संघांना उपांत्य फेरी गाठण्यात यश लाभले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या