मोठी बातमी – विराट कोहली कर्णधारपद सोडणार, सोशल मीडियाद्वारे केली घोषणा

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियाद्वारे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. आगामी 2021 टी 20 विश्वचषकानंतर टी -20 फॉरमॅटमध्ये तो टीम इंडियाचे कर्णधारपद सोडेल.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की, ‘मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, रोहित शर्मा आणि माझ्या जवळच्या लोकांशी सल्लामसलत केल्यानंतर मी टी -20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या कर्णधारपदाच्या काळात मी संघाला खूप काही दिले आहे. कामाचा ताण पाहता मी 2021 च्या टी 20 विश्वचषकानंतर टी -20 फॉरमॅटमध्ये हिंदुस्थानचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण फलंदाज म्हणून मी संघाला पाठिंबा देत राहीन.’

आपली प्रतिक्रिया द्या