… आणि तरुणीने फायनलदरम्यान लॉर्डसवर कपडे काढण्यास सुरुवात केली

153

सामना ऑनलाईन । लॉर्डस

रविवारी ऐतिहासीक लॉर्डस मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात वर्ल्डकपचा फायनल सामना रंगला. या लढतीत इंग्लंडने रोमहर्षक विजय मिळवला. या लढतीदरम्यान एका तरुणीने भर मैदानात कपडे काढण्यास सुरुवात केली. तरुणीच्या या अवतारामुळे सुरक्षारक्षकांची तिला आवारताना तारांबळ उडाली.

तरुणीने मैदानात धाव घेतली आणि कपडे काढण्यास सुरुवात केली. काळ्या कपड्यातील या तरुणीच्या कपड्यांवर ‘विटाली अनसेंसर्ड’ असे लिहिलेले होते. सुरक्षारक्षकांनी वेळीच धाव घेत महिलेला नको ते कृत्य करण्यापासून रोखले आणि मैदानाबाहेर काढले.

सुरक्षारक्षकांनी पकडलेल्या तरुणीचे नाव एलेना वुलिटस्की असे आहे. ही तरुणी आपल्या अडल्ट वेबसाईट आणि यूट्यूब चॅनेलसाठी असला प्रकार करत असते. याआधी यूईएफए चॅम्पियन्स लीगदरम्यानही तरुणीने कपडे काढण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही तिला रोखण्यात आले होते. परंतु हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करताच तिच्या फॉलोअर्सची संख्या लाखांनी वाढली होती.

आपली प्रतिक्रिया द्या