हिंदुस्थानी खेळाडूंना अश्रू अनावर

फायनलची रात्र जगज्जेते पदाची रात्र होता होता काळरात्र झाल्याने ही हार सर्वांच्याच जिव्हारी लागली. एका सामन्यात जगज्जेते पदाच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला आणि हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना अश्रू अनावर झाले. ते पाहून अवघा हिंदुस्थान हळहळला.

काल ऑस्ट्रेलियाकडून पुन्हा एकदा हार सहन करावी लागल्याचे दुःख हिंदुस्थानी संघाला सहन झाले नाही. बक्षीस समारंभानंतर ड्रेसिंग रूममध्ये पोहोचताच खेळाडूंच्या अश्रूंचा बांध अक्षरशः फुटला. मग तो कर्णधार रोहित शर्मा असो किंवा विराट कोहली. अनेक खेळाडू एकमेकांना धीर देतानाही दिसले. प्रशिक्षक राहुल द्रविड यानेही खेळाडूंना सावरण्याचा प्रयत्न केला.