जायबंदी धवन जिममध्ये करतोय व्यायाम

सामना ऑनलाईन, नॉटिंगहॅम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत अंगठय़ाला दुखापत झालेला हिंदुस्थानी सलामीवीर शिखर धवन दुखरा अंगठा जपत जिममध्ये पायाचे आणि लोअर बॉडी व्यायाम करतोय.

हाताला वजनदार बॅण्डेज बांधलेल्या अवस्थेत व्यायाम करणारा शिखर म्हणाला, अंगठय़ाला हेअरलाइन फ्रॅक्चर असले तरी माझे मनोधैर्य खचलेले नाही. मी लवकरात फिट होऊन संघात परतेन असा मला विश्वास आहे. कोटय़वधी चाहत्यांच्या शुभेच्छांनी मला शंभर हत्तीचे बळ आलेय.  धवनने अंगठय़ावर चेंडू आदळून जायबंदी झाल्यावरही झुंजार शतक झळकावत टीम इंडियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता.