धावांचा पाऊस पाडला, कारकीर्द गाजवली; पण ‘या’ दिग्गज खेळाडूंनी एकदाही वर्ल्डकप नाही खेळला

1395

दर चार वर्षांनी होणाऱ्या मानाच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करावे अशी प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. मात्र असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेट कारकीर्द तुफान गाजवली, मात्र त्यांना विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली नाही. अशाच पाच खेळाडूंबाबत आपण जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे यात 2 हिंदुस्थानी खेळाडू आहेत.

व्हीव्हीएस लक्ष्मण –

images
एकेकाळचा मिडल ऑर्डरमधील हिंदुस्थानचा महत्वाचा खेळाडू असणाऱ्या व्हीव्हीएस लक्ष्मणने आपली क्रिकेट कारकीर्द गाजवली. सचिन, गांगुली, द्रविडनंतर लक्ष्मण सर्वात भरवशाचा खेळाडू होता. लक्ष्मणने 134 कसोटी लढतीय 17 शतकांच्या बळावर 8781 धावा चोपल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायला त्याला विशेष आवडायचे. कसोटीत धावांचा पाऊस पडलेल्या लक्ष्मणने 86 एकदिवसीय लढतीत 6 शतक आणि 10 अर्धशतक यांच्या मदतीने 2338 धावा केल्या. मात्र कसोटीप्रमाणे एकदिवसीय क्रिकेटमधील सलग चांगली कामगिरी त्याला जमली नाही.

जस्टिन लँगर –

images-1
जस्टिन लँगर याची ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूत गणना होते. जस्टिन लँगरने 105 कसोटी लढतीत फलंदाजी करताना 7,696 धावा चोपल्या. कसोटीत दमदार असणाऱ्या या खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये फक्त 8 लढती खेळल्या आहेत. यातही त्याला एकदाही पन्नासचा आकडा गाठता आला नाही. कसोटीमध्ये धावांचा पाऊस पाडत राहिलेल्या जस्टिन लँगरने आपला अखेरचा एकदिवसीय सामना 1997 मध्ये खेळला. त्यानंतर जवळपास 10 वर्ष तो कसोटी क्रिकेट खेळला.

ऍलिस्टर कूक –

images-4
इंग्लंडच्या महान खेळाडूत स्थान मिळवलेला ऍलिस्टर कूक हा देखील विश्वचषकाला मुकला. 161 कसोटी खेळलेल्या ऍलिस्टर कूकने 12 हजारांहून अधिक धावा ठोकल्या. कसोटीसह 92 एकदिवसीय लढतीत त्याने 3,204 धावाही केल्या. 2018 ला त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

ख्रिस मार्टिन –

images-2
न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासात सर्वोत्तम गोलंदाजांची यादी करायची म्हटल्यास त्यात एक नाव ख्रिस मार्टिन हे असणार आहे. ख्रिस मार्टिनने 71 कसोटीत 233 बळी घेतले. 2000 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या ख्रिस मार्टिनने आपल्या 13 वर्षाच्या कारकिर्दीत फक्त 20 एकदिवसीय लढती खेळल्या. यात त्याने 18 विकेट्स घेतल्या. 2007 च्या विश्वचषकात जायबंदी डॅरिल टफी ऐवजी त्याला संघात स्थान मिळाले, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

इरापल्ली प्रसन्ना –

images-3
हिंदुस्थानचे दिग्गज फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांनी 1962 ते 1978 या काळात 49 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 189 विकेट्स घेतल्या. तसेच 735 धावाही केल्या. मात्र त्यांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या