चेतेश्वर पुजारानं बजावला मतदानाचा हक्क

21

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. ८९ जागांसाठी हे मतदान होत असून ९७७ उमेदवार रिंगणात आहेत. पहिला टप्प्यातील मतदानात मुख्यमंत्री विजय रूपानी, काँग्रेस नेते शक्तिसिंह गोहिल, परेश धनानी यांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार आहे. गुजरातमध्ये गेली तब्बल २२ वर्षे भाजप सत्तेवर असून यावेळी सत्ता राखणे भाजपला कठीण असल्याचे चित्र दिसून आले आहे.

हिंदुस्थानी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारानं राजकोटमध्ये आपला मतदानाचा हक्का बजावला. तर दुसरीकडे एक जोडपं चक्क लग्नाच्या आधी मतदानासाठी पोहोचले. लग्नाच्या पोशाखामध्येच हे जोडपं मतदानासाठी पोहोचलं. यावेळी ते सर्वांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरले.

आपली प्रतिक्रिया द्या