युवराज सिंगने वापरला जातिवाचक शब्द, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केली माफीची मागणी

2858

टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर क्रिकेटपटू युवराज सिंग एका वादात अडकला आहे. एका लाईव्ह व्हिडीओमध्ये क्रिकेटपटूला उद्देशून जातिवाचक शब्द उच्चारल्याने त्याच्यावर टीका होत आहे. नेटकऱ्यांनी युवराजने माफी मागावी, अशी मागणी करत एक नवीन हॅशटॅग ट्रेंड केला आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी युवराज सिंग आणि टीम इंडियाचा फलंदाज रोहित शर्मा यांच्यात इन्स्टाग्राम लाईव्ह चॅट सुरू होता. या दरम्यान त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. कोरोनापासून ते क्रिकेटपर्यंत अनेक विषयांवर त्यांनी गप्पा मारल्या. गप्पांच्या ओघात युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोन क्रिकेटपटूंचा उल्लेख झाला. त्यावेळी युवराजने एक जातिवाचक शब्द उच्चारला.

त्याच्या संभाषणानंतर ट्विटरवर #युवराज_सिंह_माफी_मांगो असा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. ती मस्करी होती हे मान्य केलं तरी जातिवाचक शब्द उच्चारणं चूक असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी युवराज सिंग याने माफी मागावी अशी मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या