सहा वर्षाच्या मुलाने शाळेत केला गोळीबार; आई-वडिलांना अटक 

1148

अमेरिकेतील अलाबामा राज्यात पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या एका सहा वर्षाच्या मुलाने शाळेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा सहा वर्षाचा मुलगा शाळेत जाताना आपल्यासोबत बंदूक घेऊन गेला आणि चुकून ती बंदूक त्याकडून चालवली गेली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेनंतर या मुलाच्या आई-वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना विल्कोक्स काउंटीच्या जेई हॉब्स एलिमेंट्री शाळेतील आहे. या शाळेत पहिलीच्या वगार्त शिकत असलेल्या मुलाने आपल्यासोबत घरात असलेली बंदूक शाळेत घेऊन गेला. मित्रांना दाखवत असताना त्याकडून ही बंदूक चुकून चालवली गेली. बंदुकीतून सुटलेली गोळी ही भिंतीला लागली. ही बंदूक या मुलाच्या कोटच्या खिशात होती. याप्रकरणी पोलिसांनी या मुलाच्या आई-वडिलांना अटक केली असून पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या