नवऱ्याला दारु सोड म्हणणे पत्नीच्या जीवावर बेतले, संतप्त पतीने पेट्रोल टाकून जाळले

बेगुसरायमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका नवऱ्याला दारु सोड असे सांगणे एका पप्नीच्या जीवावर बेतले आहे. संतापलेल्या नवऱ्याने बायकोला जीवंत जाळले आहे. ही घटना मंगळवारी सोनमा गावात रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

बेगुसराऊ येथील बखरी परिसरात ही घटना घडली आहे. रिडू कुमारी (25) असे मृत महिलेचे नाव आहे. तर जितेन्द्र कुमार असे तिच्या नवऱ्याचे नाव आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेन्द्र कुमार कायम दारु पिऊन पत्नीला मारहाण करायचे. मंगळवारी रात्री जेव्हा रिडू कुमारीने तिला दारु प्यायला विरोध केला आहे. त्यामुळे दोघांमध्ये वाद पेटला आणि संतापलेल्या जितेन्द्रने बायकोवर पेट्रोल टाकून आग लावली. आगीने होरपळलेल्या रिडूचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच बखरी पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी जितेन्द्र याला अटक केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन बेगूसराय रुग्णालयात नेण्यात आले आहे.