पत्नीला एएसआयसोबत नको त्या अवस्थेत पकडले, पतीने केली आत्महत्या

एका व्यक्तीने बायकोला एएसआयसोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना झारखंडमध्ये घ़डली आहे. याप्रकरणी आरोपींचा तपास सुरु असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.

झारखंडच्या धनबादमध्ये 31 वर्षांच्या सेंटू चक्रवर्ती नावाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, सेंटू आपल्या पत्नीसोबत निरसा ठाण्यात जेवण बनवण्याचे काम करतो. नातेवाईकांचा आरोप आहे की, त्याच्या पत्नीचे ठाण्याचे एएसआयसोबत अनैतिक संबंध होते. सेंटूने त्याच्या बायकोला एएसआयसोबत रंगेहात पकडले होते. त्यानंतर त्या पोलिसाने सेंटूला मारहाण केली होती. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे. मृतकाच्या कुटुंबियांनी त्याचा मृतदेह पोलीस ठाण्याच्या बाहेर ठेऊन दोषींवर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

याप्रकरणी ठाण्याचे इंचार्ज सुनील कुमार सिंह यांनी सांगितले की, पिडीत तरुणाच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली आहे. सिंटू आणि तिची पत्नी निरसा पोलीस ठाण्यात काम करत होती. दरम्यान तिथे असलेल्या एएसआयचे सिंटूच्या पत्नीसोबत सुत जुळले. त्याबाबत सिंटूने त्यांना रंगेहात पकडले होते आणि दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. त्याबाबत त्याच्या पत्नीने पोलिसाला सांगितल्यावर त्याने सिंटूला मारहाण केली होती. त्यामुळे तणावात येऊन सिंटूने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी अधिक तपास सुरु असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.

मृत सेंटू चक्रवर्तीच्या आईचे म्हणणे आहे की सात वर्षांपूर्वी तिच्या मुलाचे लग्न झाले होते. एएसआय अविनाश कुमार वरुन पती-पत्नीमध्ये मोठा वाद झाला होता. पत्नीने ही गोष्ट ठाण्याच्या एएसआयला सांगितले की त्यांनी सेंटूला मारहाण केली होती. त्यानंतर तो प्रचंड तणावात होता. सेंटू सासरी आपल्या पत्नीसोबत राहत होता.