अंकुलगा सय्यद येथे चोरट्यांनी दोन घरे फोडली, लाखोंचा ऐवज लंपास

शिरुरअनंतपाळ तालुक्यातील मौजे अंकुलगा सय्यद येथे चोरट्यांनी दोन घरे फोडली. रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा 126410 रुपयांचा ऐवज पळवण्यात आला.

शिरुर  अनंतपाळ पोलीस ठाण्यात या चोरी प्रकरणी लक्ष्मण गोविंद कोरे यांनी तक्रार दाखल केली. अज्ञात चोरट्यांनी  त्यांच्या घरात प्रवेश करुन दीड तोळयाचे सोन्याचे गंठन, तीन ग्रॅमचे सरपाळे, तीन ग्रॅमची सोन्याची अंगठी रोख रक्कम 2 हजार असा ऐवज पळवला. त्याचप्रमाणे गावातील रमेश  माधवराव कोयले यांच्या घरातून रोख 26910 रुपये असे एकूण 126410 रुपयांचा ऐवज पळवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक मानुल्ला हे करीत आहेत.