गुन्हे उघडकीस आणण्यावर भर देणार- पुणे पोलीस उपायुक्त

शहरातील विविध पोलीस ठाण्यातंर्गत घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यावर भर देण्याचे आदेश पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिले आहेत. नवनियुक्त पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी सूचित केले आहे. पोलीस आयुक्तालयात आज झालेल्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना कामासंदर्भात मार्गदर्शन केले.

गुन्हे शाखेची कामगिरी अधिकाधिक सुधारण्यासाठी त्यांनी उपस्थित नवनियुक्त अधिकाऱ्यांना माहिती दिली. प्रत्येक गुन्हे शाखेच्या हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यासह इतरांची मदत घेतली जाणार आहे. पुर्वीच्या घडलेल्या गुन्ह्यांची माहिती आणि सद्यःस्थितीतील गुन्हेगारी यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांनी गुन्हे उघडकीस आणण्यास भर देण्याचेही पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी सूचित केले.

आपली प्रतिक्रिया द्या