शहला रशीदवर अफवा पसरवल्याप्रकरणी तक्रार दाखल, अटकेची मागणी

हिंदुस्थानचे जवान आणि हिंदुस्थान सरकारविरोधात अफवा पसरवल्याबद्दल जम्मू कश्मीर पिपल्स मूव्हमेंट पक्षाची नेता शहला रशीद हिच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी शहला हिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

कलम 370 हटवल्याचा विरोध करत कश्मीरची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचा दावा शहलाने केला होता. त्यासाठी रविवारी तिने काही ट्वीट्स केले होते. हिंदुस्थानी सैन्य आणि पोलीस कर्मचारी नागरिकांच्या घरात घुसून त्यांना त्रास देत आहेत. शोपियान सुरक्षा दलांकडून काही लोकांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्यांचा छळ केल्याचा दावा या ट्वीट्समधून शहलाने केला होता. या ट्वीट्समधून हिंदुस्थानी जवान आणि हिंदुस्थान सरकार यांच्याविरोधात अफवा पसरवणे आणि दिशाभूल करण्याबद्दल श्रीवास्तव यांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. श्रीवास्तव यांनी शहला हिच्या तत्काळ अटकेची मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या