बिटकॉईन आपटला, गुंतवणूकदार गोंधळला

46

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

बिटकॉईन सारख्या क्रिप्टो करन्सीज बेकायदेशीर असून हिंदुस्थानमध्ये त्याला मान्यता मिळणार नाही असे स्पष्ट करत अर्थमंत्री जेटली यांनी देशात क्रिप्टो करन्सीजवर बंदी घालण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळत होता. पण ही ग्राहकांची फसवणूक करणारी योजना असल्याचे सरकारने म्हटले होते. अखेर आजच्या अर्थसंकल्पात यावर बंदी घालण्यात आल्याचे सरकारने सांगितले.

बिटकॉईन बद्दल लोकांमध्ये उत्सुकता वाढत असल्याचे बघून केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला होता. साध्या भोळ्या नागरिकांची फसवणूक करणारी ही करन्सी असल्याने लोकांनी सावध राहावे असेही सरकारने म्हटले होते. तसेच अर्थमंत्रालयाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात बिटकॉईन बेकादेशीर असून याच्यात गुंतवणूक करणे जोखमीचे असल्याचे म्हटले होते. तसेच बिटकॉईनमध्ये छोट्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्यास त्यांच्या कष्टाची कमाई क्षणात पाण्यात बुडू शकते, असेही या पत्रकात सांगण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या