रोनाल्डोच्या टी-शर्टचा भूकंपग्रस्तांसाठी होणार लिलाव

तुर्कस्तान आणि सीरियात भूकंपामुळे मोठय़ा प्रमाणावर जीवित आणि आर्थिक हानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीनंतर या दोन देशांसाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरू झालाय. आता स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनेदेखील मदतीचा खारीचा वाटा उचलला आहे. रोनाल्डोचा जुवेंट्सचा संघ सहकारी मेरिह डेमिरल हा रोनाल्डोचा हस्ताक्षर केलेला टा-शर्टचा लिलाव करणार आहे.

मेरिह डेमिरलने तुर्की आणि सीरियाच्या भूकंपानंतर ट्विट करून ही माहिती दिली. तो म्हणाला की, ‘मी आताच ख्रिस्तियानो रोनाल्डोशी बोललो. तुर्कीमध्ये जे काही झालं हे पाहून तो खूप दुःखी झाला आहे. आम्ही आमच्या कलेक्शनमधील ख्रिस्तियानो रोनाल्डोचा स्वाक्षरी केलेला टी-शर्ट लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. लिलावातून जी रक्कम येईल ती सर्व भूकंपग्रस्तांना देण्यात येणार आहे.