या शहरात मिळतंय 12 रुपयांत घर, हे आहे कारण…

शहरांच्या ठिकाणी घरांचे वाढते भाव ही एक खूप मोठी समस्या असते. लाखो करोडोंच्या न परवडणाऱ्या घरांमुळे अनेक लोक शहरांकडून निमशहरी भागाकडे स्थलांतरित होतात. पण, एका शहरात मात्र हीच परस्थिती उलट आहे.

हे शहर म्हणजे लेग्राड. क्रोएशिया नावाच्या देशाच्या उत्तर भागात हे शहर आहे. इथल्या स्थानिक प्रशासनासमोर एक विचित्र समस्या उभी राहिली आहे. इथे वाहतुकीची सोय कमी असल्याने लोक शहरातील आपलं घर विकून जात आहेत.

गंभीर म्हणजे, ते लोक हे घर अवघ्या एक कुना (12 रुपये) इतक्या किमतीला विकत आहेत. लेग्राड शहरात लोकसंख्येत घट होत आहे. कधीकाळी हा देशातील सर्वात जास्त लोकसंख्येच्या भागापैकी एक होता. पण, ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्याच्या ऱ्हासानंतर इथे लोकसंख्येत घट होऊ लागली.

आताही वाहतुकीच्या समस्येमुळे इथून लोकं निघून जात आहेत. अगदी मिळेल त्या भावात घर विकून लोक दुसरीकडे स्थायिक होत आहेत. आतापर्यंत या भागातील सतरा घरं 12 रुपयांच्या हिशोबाने विकली गेली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या