FIFA world cup 2022 ब्राझीलचा गेम ओव्हर, क्रोएशिया उपांत्य फेरीत

उपउपांत्यफेरीपाठोपाठ उपांत्यपूर्व फेरीतही क्रोएशियाने पेनल्टी शूटआऊमध्ये बाजी मारली आणि पाचवेळा जगज्जेत्या ठरलेल्या ब्राझीलचा 4-2 असा गेम ओव्हर करून फिफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत सलग दुसऱ्यांदा स्थान मिळविले. क्रोएशियाने फिफा वर्ल्ड कपमधील आपल्या पेनल्टी शूटआऊटचे  शतप्रतिशत यश कायम राखताना चारपैकी चारही शूटआऊट जिंकले. केवळ सातवाच वर्ल्डकप खेळत असलेल्या क्रोएशियाने तिसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली. एवढेच नव्हे तर गतवर्षी ते उपविजेते ठरले होते.

आजही 90 मिनिटांच्या खेळात ब्राझीलच्या अचूक आणि भेदक आक्रमकांना क्रोएशियाची बचावफळी भेदता आली नाही. क्रोएशियानेही ब्राझीलच्या गोलरक्षक बेकरला चकविण्याचे अनेक प्रयत्न केले, पण त्यांनाही यश लाभले नाही. त्यामुळे 90 मिनिटांचा खेळ गोलशून्य बरोबरीत संपला. मात्र 30 मिनिटांच्या जादा वेळेतही हा सामना गोलशून्य बरोबरीत राहणार असे वाटत असतानाच नेयमारने अतिचतुर पास लुकास पाकेताकडे दिला आणि त्याने तो परत नेयमारकडे वळविला. नेयमारने कोणतीही संधी न दवडता गोल केला. मग क्रोएशियाच्या पेतकोविचने सामना संपायला चार मिनिटे असताना अप्रतिम गोल नोंदवित सामन्याला बरोबरीत नेऊन ठेवले आणि सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये पोहोचला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

क्रोएशियाचे शंभर टक्के यश

क्रोएशियाने जपानविरूद्धचा सामनाही पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकला होता आणि आज त्यांनी सलग दुसऱ्यांदा आणि वर्ल्डकपमध्ये सलग चौथ्यांदा पेनल्टी शूटआऊट जिंकत आपल्या शंभर टक्के यशाची मालिका कायम ठेवली. क्रोएशियाने रशियातही दोन पेनल्टी शूटआऊट जिंकले होते. आज त्यांच्या निकोला व्लासिच, बोर्ना बारिसिच, लुका मॉद्रिच आणि मिस्लाव ओरसिच या चौघांनीही पेनल्टीवर गोल नोंदविले. लिवाकोविचने आज ब्राझीलच्या रॉद्रिगोची पहिली पेनल्टी रोखली. ब्राझीलकडून कासेमिरो आणि पेड्रोने गोल केले.