अंबानींच्या बंगल्यावर तैनात असलेल्या जवानाचा गोळी लागल्याने मृत्यू

865
प्रातिनिधिक

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या बंगल्यावर तैनात असलेल्या जवानाचा त्यांच्याच रायफलमधील गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. या जवानाच्या हातून चुकून गोळी सुटली होती असे समोर आले आहे. रामभाई बोटारा असे त्या जवानाचे नाव असून ते सीआरपीएफचे जवान होते.

रामभाई हे व्हीआय़पी सिक्युरिटी कव्हरमधील जवान होते. ते मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईत असलेल्या अँटिलिया या बंगल्यावर सुरक्षेसाठी तैनात होते. बुधवारी रामभाईंच्या रायफलमधून चुकून गोळीबार झाला व त्याच्या दोन गोळ्या त्यांनाच लागल्या. यात ते गंभीर जखमी झाले होते. अखेर गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या